लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची बैठक

पाटणा : लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच देशातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपला हरवण्यासाठी कामाला लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बिहारच्या पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक होत आहे.

एकूण 23 विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लागलं आहे.मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध नेते उपस्थित झाले आहेत.

🤙 8080365706