नॅशनल समर कॉम्पीटीशिन मध्ये आरव पाटील चे दैदीप्यमान यश

कोल्हापूर : प्रोॲक्टीव्ह ॲबॅकस आयोजित नॅशनल कॉम्पीटीशिन 2023 मध्ये आरव पाटील याने दैदीप्यमान यश संपादन केले आहे. महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात आरवचा ट्रॉफी प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

सदर स्पर्धेमध्ये विविध लेवल च्या जवळपास 7900 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.यामध्ये झेप प्रोॲक्टीव्ह ॲबॅकस फुलेवाडी, केंद्र / शाखा येथील आरव प्रल्हाद पाटील याने प्रथम लेवल परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये 6 वा क्रमांक घेवून यश संपादन केले. इतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यााना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

झेप प्रोॲक्टीव्ह ॲबॅकस फुलेवाडी केंद्राला उत्कृष्ट क्लास म्हणून केंद्रचालक व टीचर धनराज आमटे यांना व त्यांचे केंद्रास पारितोषिक देण्यात आले. अबॅकस स्पर्धेमध्ये झेप इन्स्टिट्यूटने घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये आठ जिल्ह्यातून चौदाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या मध्ये इन्स्टिट्यूटच्या 68 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट च्या अध्यक्षा प्रणाली आमते व संचालक धनराज आमते यांचे मार्गदर्शन लाभले.

🤙 8080365706