
कोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हन्ट को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये भास्करराव जाधव यांची 156 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

भास्करराव जाधव यांच्या पुतळ्यास बँकेचे जेष्ठ संचालक गटनेते रवींद्र पंदारे व संचालकांनी पुष्पकार घालून अभिवादन केले. भास्करराव जाधव यांचा आदर्श व दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कामकाज करीत असल्याचे संचालकांनी यावेळी सांगितले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करीत बँक शतकोत्तर वाटचाल करत असून 107 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. भास्करराव जाधव यांच्या आर्थिक साक्षरतेच्या विचारांचा ठेवा जतन करून बदलत्या आधुनिक बँकिंग कामकाजाचा अवलंब करत बँकेच्या प्रगतीसाठी यापुढेही काम करत राहणार असल्याचे संचालकांनी यावेळी सांगितले.
यावेळी अध्यक्ष शशिकांत तीवले, उपाध्यक्ष अजित पाटील, संचालक सर्वश्री मधुकर पाटील, अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर, विलासराव कुरणे, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, हेमा पाटील, मनुजा रेनके, संजय खोत, किशोर पोवार, अरविंद आयरे, प्रकाश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, मुख्य लेखापाल रुपेश पाटोळे यांच्यासह सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते.
