
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांचे कोणतेही शासकीय काम करण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल. आणि त्यांची सर्व शासकीय कामे करून दिली जातील. अशी माहिती अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांनी दिली. सोबतच त्यांनी 9673506555 / (0231) 2540989 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
‘लाच घेणे आणि देणे या दोन्ही प्रवृत्ती संपवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) थेट तक्रारदारापर्यंत पोहोचत आहे. तक्रारदाराने पायपीट करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. तक्रारदारांनी फक्त या विभागाच्या नंबरवर एक फोन करावा. यानंतर लगेच एसीबीचे अधिकारी तक्रारदारापर्यंत पोहोचणार आहेत. लाचखोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी हे पुढचे पाऊल उचलले आहे.
