उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांचे झळकले वादग्रस्त बॅनर्स

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर  यांच्यावर औरंगजेबच्या कबरीला भेट दिल्याच्या मुद्द्यावरुन थेट बॅनर्समधून निशाणा साधण्यात आला आहे. मुंबईच्या माहिम परिसरामध्ये रात्री अज्ञात व्यक्तींनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त बॅनर्स झळकवले.

‘औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे’ अशा ओळी असलेलं बॅनर लावण्यात आलं आहे. हे वाक्य ‘शिवरायांची जनता’ म्हणत असल्याचंही बॅनरवर म्हटलं आहे. या वाक्याच्या उजव्या बाजूला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हस्तांदोलन करताना दिसत आहेत. तर या दोघांच्या मागे औरंगजेबचा फोटो लावण्यात आला आहे.मुंबईत झळकलेल्या या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री हे बॅनर्स झळकावण्यात आले आहे. मात्र हे बॅनर्स कोणी झळकवले यासंदर्भातील कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी हे बॅनर्स रात्रीच उतरवले आहेत. या प्रकरणामध्ये कोणीही कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. या बॅनर्समुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले जातील असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

🤙 8080365706