
भारतीयांच्या घरातबाहेर आवर्जून लावलेली दिसते. आयुर्वेदात अतिशय महत्त्व असलेली ही तुळस आरोग्याच्या बऱ्याच तक्रारींसाठी अतिशय फायदेशीर असते. तर जाणून घेऊयात तुळशीचे फायदे.

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिणे दिवसाची सुरुवात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. विषारी पदार्थ शरीराबाहेर पडण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. अँटीऑक्सिडंटस असल्याने पोटातील अनावश्यक घटक शरीराबाहेर पडण्यास मदत होते.
श्वसनाच्या रोगांवर इलाज करण्यासाठी तुळशीची पाने अतिशय चांगला उपाय आहे. फुफ्फुसं साफ करण्यासाठी ही पाने फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुळशीच्या पानांचा चहा किंवा काढा आवर्जून प्यायला हवा.
तुळस एकप्रकारची डीटॉक्सिफायर म्हणूनही काम करते. यात असणारे गुण किडणी साफ करण्यास फायदेशीर ठरतात. तसेच रक्तात जमा झालेले युरीक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी तुळस खाणे फायदेशीर असते.
कोलेस्टेरॉल ही सध्या सर्वच वयोगटातील वाढती समस्या आहे. कोलेस्टेरॉल वाढल्यास हृदयविकाराचा धोका असल्याने ते नियंत्रणात ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. तुळशीत अँटीव्हायरल आणि अँटी कोलेस्टेरॉल गुणधर्म असतात. त्यामुळे लिपिड कमी करण्यासाठी, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी नियमित तुळस खायला हवी.
