गोखले कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. मंजिरी मोरे यांना दुबई येथे विशेष पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : येथील गोखले कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर मंजिरी मोरे यांना बिझनेस टायटन्स फॉर एक्सलन्स इन हायर एज्युकेशन पुरस्काराने दुबई येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

रेडिओ सिटी तर्फे दुबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन अध्यापिका डॉक्टर मंजिरी अजित मोरे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले बद्दल मान्यवरांच्या हस्ते बिझनेस टायटन्स फॉर एक्सलन्स इन हायर एज्युकेशन हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मोरे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. शिक्षण प्रसारक मंडळ व गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या यशस्वी कार्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्राध्यापक जयकुमार देसाई पेट्रन सदस्य दौलत देसाई , अजित मोरे कु. पृथ्वीराज मोरे यांचे सहकार्य लाभले.

🤙 8080365706