
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर (गोकुळ) मार्फत जागतिक योग दिनानिमित्ताने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे योगदिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले योग प्रशिक्षिका गीतांजली ठोमके यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी मार्गदर्शन करताना संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की, योगासने ही भारताची प्राचीन परंपरा आहे. मेंदू आणि शरीर यांच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. योगा हा संयमी विचाराचे पूर्णत्वाचे दान करणारा आहे. योगाचा अभ्यास हा फक्त व्यायामापूरता नाही तर एकाग्रता आणि चेतना निर्माण करण्यासाठीही आहे. त्यामुळे बैद्विक पातळी सुधारण्यासही योगा आपणास मदत करतो. मन,शरीर आणि आत्मा यांना तंदुरूस्त ठेवण्याचे काम योगासने करतात. म्हणूनच माझे सांगणे आहे की, योगासने करा, निरोगी रहा.असे प्रतिपादन गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांनी जागतिक योग दिनानिमीत्य ताराबाई पार्क येथे आयोजित .योग शिबीरा प्रसंगी कर्मचा-यांना स्वतः योगाची प्रात्यक्षिके देताना केले. यावेळी योग विद्येतील विविध योगासनांची व प्रात्यक्षिके श्री पाटील यांनी सर्वांगासन,पादान्गुष्टासन, शशिकासन, मंडूकासन मकरासन,भुजंगासन,धनुरासन,विपरीतनौकासन,पर्वतासन, ताडासन इ. आसने कर्मचा-यांसमोर सादर करुन सदरञची योगासने कर्मचा-यांकडून करवून घेतली आणि ही आसने नित्यनियमाने सर्व कर्मचा-यांनी करावीत असे आव्हानही त्यांनी केले.
यावेळी. योग विद्येतील विविध योगासनांची माहिती योग प्रशिक्षिका गीतांजली ठोमके यांनी सांगितली. यावेळी गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२३ साठी “मानवता” ही संकल्पना असून. शरीर, मन, समाज आणि अगदी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचे विशेष महत्त्व आहे. शांतता, आणि प्रगतीसाठी योग हे फार गरजेचे आहे. असे मनोगत व्यक्त केले .गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे कर्मचा-यांसमवेत जागतीक योग दिनानिमीत्य योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूञ संचालन श्री.एम.पी.पाटील यांनी केले. आभार संग्राम मगदूम यांनी मांडले. यावेळी योग शिबीरात कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप, पाटील,प्रशासन व्यवस्थापक डी के पाटील, डॉ.मोगले,डॉ.प्रकाश दळवी, डॉ.व्ही डी पाटील ,संकलन अधिकारी बी आर पाटील, दत्तात्रय वागरे व इतर अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
