ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरावर ईडीची छापेमारी

मुंबई : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. चेंबूर येओथील के के ग्रँड इमारतीतील सूरज चव्हाण यांच्या 11 व्या मजल्यावर छापेमारी करण्यात आली आहे.

त्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. कोविडच्या काळात लाईफलाईन सर्व्हिस या कंपनीने केलेल्या घोटाळ्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या छापेमारीचं वृत्त येताच शिवसैनिकांनी चेंबूर येथे चव्हाण यांच्या घराबाहेर प्रचंड गर्दी केली. यावेळी शिवसैनिक आपल्या जुन्या आवेशात दिसले. या शिवसैनिकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे चव्हाण यांच्या इमारतीखाली तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केल्यानंतर शिवसैनिकांचा पारा चढला. असंख्य शिवसैनिकांनी चव्हाण यांच्या घराबाहेर जमून या कारवाईचा निषेध नोंदवला. तसेच शिंदे सरकार विरोधात संतापही व्यक्त केला.

🤙 8080365706