संजय राऊत यांना धक्का देणारी बातमी…..

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना धक्का देणारी बातमी आहे. संजय राऊत यांच्या निकटवर्तीय असलेल्या एका व्यक्तीच्या घर आणि कार्यालयावर ईडीने सकाळी सकाळीच छापेमारी केली आहे.

एकूण 10 ठिकाणी ईडीने सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसने कोविड काळात केलेल्या घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही छापेमारी सुरू केली आहे. आधीच या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडून केली जात असतानाच आता ईडीने त्यात उडी घेतल्याने या घोटाळ्यातील सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.

संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजीत पाटकर यांची लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विसेस ही कंपनी आहे. कोविड काळात वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम या कंपनीला दिलं होतं. पण त्यात मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. त्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू झाला होता. हा तपास सुरू असतानाच ईडीने या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून पाटकर यांना दणका दिला.

🤙 8080365706