मोफत एसटी प्रवास पास साठी मुख्याध्यापकांनी मुलींची यादी संबंधित आगारप्रमुखांकडे देण्याचे आवाहन

सोलापूर : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पाचवी ते १२वीपर्यंतच्या मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. प्रत्येक मुख्याध्यापकांनी त्यांचा शाळेमधील मुलींची यादी संबंधित आगारप्रमुखांकडे द्यावी. ज्या शाळांमध्ये मुलींची संख्या ५० ते १०० पेक्षा अधिक असेल, त्याठिकाणी संबंधित आगाराचे अधिकारी जाऊन जागेवरच पास देतील.

यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात गुरुवारपासून (ता. १५) झाली आहे. ग्रामीण भागातील मुलींना शाळेत ये-जा करण्याची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोफत पास देण्याची सोय केली आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना हा लाभ मिळतो. बारावीनंतरच्या मुलींना एक तृतीयांश रक्कम भरल्यावर शैक्षणिक सवलतीचा पास दिला जातो.

🤙 8080365706