
कोल्हापूर : साथीच्या रोगाबाबत करावयाच्या उपायोजना बाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी दक्ष राहिले पाहिजे. याबाबतीत कामात कुचराई झाली. जे कर्मचारी गांभीर्याने काम करणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत दिला.

राधानगरी तालुक्यातील तारळे गावतील डेंग्यू साथीचा उद्रेक झाल्याने त्याबाबतचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सदरची साथ बरेच दिवस राहिली. याबद्दल अळयांचा नाईनाट करणे व वेगवेगळया उपाययोजना राबविणेमध्ये आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी तात्काळ उपाययोजना राबविले नसल्याने त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई का करू नये अशी या बैठकीत विचारणा करण्यात आली. तसेच क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायतीचा सक्रिय सहभाग घेणेबाबत 21 जून रोजी सर्व प्रा.आ.केंद्रामध्ये तसेच उपकेंद्रांमध्ये योगदिन साजरा करणेबाबत. 21 जून आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त योगदिन कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्याबाबतच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमामध्ये वृद्धी होणेसाठी सर्व कर्मचाऱ्यांचा दर आठवडयाला आढावा . कुष्ठरोग रुग्णांची संख्या कमी करणेसाठी योग्य त्या उपाय योजना राबविणे. ज्या भागात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे ती रोखणेकरीता कर्मचाऱ्यांनी तेथील डास अळी घनता योग्य तपासावी, रुणसंख्येत होणारी वाढ त्वरीत कळवावी व ज्या-त्या वेळी उपाययोजना राबवाव्या. अधिसूचना बैठकीत देण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
