
मुंबई : “जेव्हा आदित्य ठाकरे अयोध्येला प्रभू रामाच्या दर्शनासाठी गेले होते. तेव्हाच या आमदारांना तिकडं ठेवून घ्यायचं असं ठरलं होतं. आमदारांना घेऊन तिथंच राहायचं.अन् बंड करायचं असं त्यांचं ठरलं होतं. तिकडं जायचं ठरलं होतं. तेव्हा एका आमदाराने माझं तिकीट सुद्धा काढलं होतं. पण नंतर निरोप आला की तो दौरा रद्द झाला म्हणून…. नाही तर तेव्हाच बंड झालं असतं. तशी कुणकुण मला लागली होती, मात्र आमदारांना सोबत न नेल्यानं तो प्लॅन फसला”, असं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितलं आहे.

अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आदेश बांदेकर यांनी अकोला-बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आणि धाराशिवचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांची मुलाखत घेतली. यात नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांनी मोठे खुलासे केले आहेत. याआधीच बंड झालं असतं असं देशमुखांनी सांगितलं आहे.
