उज्वला बाबूराव कारंडे यांची ग्राहक कल्याण फौंडेशन जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड

कुडित्रे: खपीरे (ता.करवीर) येथील उज्वला बाबूराव कारंडे यांची ग्राहक कल्याण फौंडेशन कोल्हापूरच्या जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड झाली.

जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड केली.

त्यांना त्यांच्या निवडीबाबतचे पत्र वाकरे(ता.करवीर) येथे ग्राहक कल्याण फौंडेशन करवीर तालुक्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता अभ्यासवर्ग व शेतकरी मेळाव्या प्रसंगी ग्राहक कल्याण फौंडेशनचे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पोतदार यांच्या हस्ते देण्यात आले. त्यांना महिला आघाडी जिल्हाप्रमूख निशा बडवे,उपप्रमूख सूषमा पाटील,अरुणा पोतदार,माजी प्राचार्य भास्कर चंदनशिवे,दिपक बंडगर,जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव खाडे,जिल्हा कार्यवाहक मारूती देवाळकर ,सचिव तानाजी पाटील,शामराव पाटील यांचे सहकार्य लाभले.

🤙 8080365706