
कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखाना माझे आजोबा स्व.दादासाहेब पाटील-कौलवकर यांनी उभा केला. माझे वडील स्व.आनंदराव पाटील -कौलवकर यांच्या काळात कारखान्याला बरेच पुरस्कार मिळाले. माझ्या चेअरमन पदाच्या कारकिर्दीत मी हा कारखाना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला. मी चेअरमन झाल्यावर सभासदांच्या उसाचे थकित १४५०० टनाचे बील आदा केले, तोडणी ओढणी बीले, कामगार पगार,बोनस सर्व मी पदावर असेपर्यंत वेळेत दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक महिन्याची सुध्दा सभासद साखर थकित ठेवली नाही. अजूनही हा कारखाना ऊर्जितावस्थेत आणण्याची धमक माझ्याकडे आहे. माझ्या आजोबांच्या व सभासदांच्या घामातून उभा राहिलेली हि वास्तू टिकली पाहिजे हि माझी प्रामाणिक भावना असून, कौलवकर गटासह सहयोगी गटांचा योग्य सन्मान राखल्यास भोगावती साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चार पाऊले पुढे असेन. सन्मानजनक तोडगा न निघल्यास ताकदीने निवडणूक लढविणार असल्याचे प्रतिपादन भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील -कौलवकर यांनी केले.

प्रा निवासराव पाटील देवाळे यांनी प्रास्ताविक केले. विश्वासराव पाटील तारळे ,चंद्रहार पाटील राशिवडे ,रघुनाथ मिठारी गाडेगोंडवाडी , रणजित पाटील ठिकपुर्ली,युवराज पाटील पुंगाव,प्रा. डि. एन. पाटील तारळे खुर्द,किरण पाटील कुर्डू, दिपक पाटील बेले ,अमर डोंगळे घोटवडे,शामराव चौगुले(मामा) कुडूत्री यांची भाषणे झाली.सुत्रसंचलन प्रा.आर.बी.पाटील यांनी केले.
