बहिरेश्वर येथील दोन्ही दुध संस्थेत सत्ताधारीच

बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील दोन्ही दुध संस्थेत सत्ताधारीच भारी पडलेत. भोगावती दुध संस्थेत सत्ताधारी गटाचे नेतृत्व बाळासो बचाटे,तानाजी गोदडे,परशराम बचाटे, पंढरीनाथ काशिद यांनी केले.एकुण झालेल्या २४२ मतापैकी१४६ इतक्या मतांनी सत्ताधारी गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले…तर श्री.कृष्ण दुध संस्थेत सत्ताधारी गटाने झालेल्या ३२३ मतदानापैकी २२६ इतक्या मतांनी विजय खेचून आणला.

या गटाचे नेतृत्व माजी सरपंच सुर्यकांत दिंडे, चंद्रकांत दिंडे,तानाजी दिंडे, परशुराम पाटील यांनी केले..दोन्ही दुध संस्थेची निवडणूक ही नेत्यांच्या दृष्टीने प्रतिष्टेची होती.या निवडणुकीत साम दाम दंड या नितीचा अवलंब मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता..निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

🤙 8080365706