
मुंबई : येत्या 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाचा शिंदे गटाने टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना दाखवण्यात आलं आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. जाहिरातीत जे लोक बाळासाहेब ठाकरे यांना विसरले. ते आता टीझर दाखवत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जूनला आहे. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. ते शिवसेनेच्या वर्धापन दिनाला संबोधित करणार आहेत. गावच्या जत्रेत तंबू असतो. त्या तंबूत खोट चंद्र असतो. खोटी मोटारसायकल असते. लोक चंद्र पाहून फोटो काढतात. तशी ही खोटी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे. शिंदेंची शिवसेना ही जत्रेतील शिवसेना आहे. आमचा वर्धापन दिन वाजतगाजत आणि जोरात होणार आहे. उद्या वरळीला आमचं शिबीर आहे. ते जोरात होईल. जत्रा संपली की जत्रेतील तंबू उठतात. ते काय ट्रेलर दाखवत आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
