
गूळ हा अनेक पदार्थांसोबत खाल्ला जातो. जसे की खोबरे गुळ, गुळ शेंगदाणे, गुळ फुटाणे आणि तिळ गुळ पण तुम्हाला माहिती आहे का गुळासोबत काय खाणे अधिक चांगले? आज आपण या विषयीचा जाणून घेणार आहे.

गूळ आणि खोबरे हे बुद्धीवर्धक असतं याशिवाय हा बाप्पांचा खास नैवेद्य असतो.गूळ + शेंगदाणे हे शक्तिवर्धक असतं. हा श्री हनुमानाचा खास नैवेद्य आहे.
गूळ आणि फुटाणे हे हिमोग्लोबींन वर्धक व रक्तशुद्ध करण्यासाठी फायदेशीर आहे. हाश्री बालाजीचा प्रसाद आहे.
तीळ आणि गूळ हे कॅल्शियम, मॅग्नेशियम,आयर्न, झिंक, सेलेनियम शरीराला पुरवतं. हृदयासाठी सुद्धा हे फायदेशीर असून थंडीमध्ये शरीर गरम ठेवायला उपयोगी असतं. म्हणूनच संक्रांतीला गूळ पोळी आवडीने खाल्ली जाते.थंडीत बाजरीची तीळ लावलेली भाकरीसुद्धा अधिक फायदेशीर असते. यामुळे शरीरात ऊर्जा (उष्णता) निर्माण होते.डिंकाचे लाडु किंवा राजगिरा लाडू गुळतूप पोळी, शेगदाणा चिक्की किंवा भिजवलेले हरबरे यामुळेही ताकद मिळते.
