नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव बदललं ; काँग्रेस आक्रमक

दिल्ली : नवी दिल्लीत असलेलं नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव बदलण्यात आलं आहे. या म्युझियमचं नाव आता ‘प्राइम मिनिस्टर म्युझियम लायब्ररी’ असं करण्यात आलं आहे.मोदी सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीच्या एका विशेष बैठकीत या म्युझियमचं नाव बदण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विशेष बैठक केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राजनाथ सिंह हे या सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत.

या निर्णयानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश ट्विट करत म्हणाले की, गेल्या ५९ वर्षांहून अधिक काळापासून हे म्युझियम आणि ग्रंथालयात एक जागतिक बौद्धिक ऐतिहासिक स्थळ आणि पुस्तकांचं घर आहे. आता या स्थळाला पंतप्रधान म्युझियम आणि सोसायटी म्हटलं जाणार आहे. पंतप्रधान मोदी हे राष्ट्राचे शिल्पकार यांच्या नाव आणि इतिहासाला विद्रूप करणे, कमी लेखणे आणि नष्ट करण्याचं काम करत आहे. एक लहान व्यक्तिमत्व व्यक्ती स्वत:ला स्वयंघोषित विश्वगुरू म्हणत हिंडत आहे’.

🤙 8080365706