
कोल्हापूर : राजर्षी शाहुंच्या समतावादी नगरीतील धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानाच्या व सन्मानाच्या राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराचे वितरण रविवार दि. 18 जून, 2023 रोजी दुपारी 12:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर या ठिकाणी होणार असून यावेळी साहित्यिक व विचारवंत डॉ. बाबुराव गुरव, शिवराय फुशांबु ब्रिगेड, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत फडतरे यांना राजर्षी शाहू प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार तर राजर्षी शाहुंच्या विचारांना आदर्श मानून कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांनी पत्रकार परिषदेत दिली. मान्यवारांना राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजीव आवळे, विद्रोही शाहीर संभाजी भगत, ज्येष्ठ विचारवंत प्रा. टी. के. सरगर, धम्म अभ्यासिका विजया कांबळे, धम्मलिपीच्या अभ्यासिका छाया पाटील, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, बालनाट्य अलबत्या गलबत्या फेम सागर सातपुते, फोटोग्राफर राजवीर जाधव, अमर पारखे, संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका डॉ. शोभा चाळके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांनी केले आहे.पत्रकार परिषदेला अनिल म्हमाने, सुरेश केसरकर, डॉ. निकिता खोबरे, नामदेव मोरे, जयश्री नलवडे, अरहंत मिणचेकर उपस्थित होते.
