महाराष्ट्र प्रीमियर लीगचा शुभारंभ

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) चा शुभारंभ गहूंजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानात झाला.

या स्पर्धेचे उदघाटन गणेशवंदनाने झाली. त्यानंतर मराठी आणि हिंदी गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले. शंकर महादेवन यांनी गायलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगचे टायटल सॉंगवर अमृता खानविलकर हिने नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.उद्घाटनप्रसंगी एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार, उपाध्यक्ष किरण सामंत, सचिव शुभेंद्र भांडारकर, सहसचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज आणि एमपीएलचे अध्यक्ष सचिन मुळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

🤙 8080365706