‘या’ काही टिप्समुळे फ्रिज होईल काही मिनिटात स्वच्छ

आपण देखील रेफ्रिजरेटरच्या दुर्गंधीमुळे हैराण असाल, तर ही ट्रिक नक्की वापरून पाहा. या काही टिप्समुळे फ्रिज काही मिनिटात स्वच्छ होईल व त्यातून दुर्गंधी देखील पसरणार नाही.

फ्रिजमध्ये असलेले प्रत्येक कप्पे स्वच्छ करा. कप्पे स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याची मदत घ्या, एका वाटीत बेकिंग सोडा आणि पाण्याचं मिश्रण तयार करा, या मिश्रणाने संपूर्ण फ्रिज क्लिन करून घ्या. या उपायामुळे फ्रिजमधील दुर्गंधी कमी होईल.

फ्रिजमधील संपूर्ण सामान काढल्याने, फ्रिज लवकर स्वच्छ होते. यासाठी फ्रिजमधील शेल्व्स  क्लिन करून बाहेर काढून ठेवा, बेकिंग सोडा आणि पाण्याच्या मिश्रणाने फ्रिज स्वच्छ करा.

अनकेदा फ्रिज साफ केल्यानंतरही त्यातून दुर्गंधी निघून जात नाही. फ्रिजमधून दुर्गंधी काढण्यासाठी व्हॅनिला एक्सट्रॅक्टमध्ये कॉटन बॉल बुडवा, व हे कॉटन बॉल एका वाटीमध्ये ठेवा. ही वाटी फ्रिजच्या मधोमध ठेवा. या उपायामुळे फ्रिजमधून दुर्गंधी येणार नाही.

🤙 8080365706