चक्रीवादळ मोसमी पावसासाठी पूरक

मुंबई : बिपरजॉय गुजरातच्या किनारपट्टीकडे वाटचाल करीत आहे. चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी चार ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान जाखू बंदराच्या उत्तरेकडील भागात धडकेल. चक्रीवादळ मोसमी पावसासाठी पूरकच ठरले आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी चार ते आठ वाजण्याच्या दरम्यान जाखू बंदाराच्या उत्तरेकडील भागात धडकेल. या वेळी वाऱ्याचा वेग 150 किमोमीटर प्रती तासांवर जाण्याची शक्यता आहे. कच्छ परिसराला वेगवान वारे आणि अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसेल. कच्छसह द्वारका, मोरबी, पोरबंदर, राजकोट परिसरात 125 ते 135किलोमीटर वेगाने वारे वाहील. वाऱ्याचा वेग ताशी 145 किलोमीटरपर्यंत वाढू शकतो. कच्छ आणि द्वारका जिल्ह्यांत सर्वाधिक हानी होऊ शकते. गुजरातच्या अन्य भागात पावसाची शक्यता आहे. राज्यस्थान दक्षिण भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

🤙 8080365706