उल्हासनगरमध्ये 55 रुपये लिटर दराने पेट्रोल

उल्हासनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरमध्ये 55 रुपये लिटर दराने पेट्रोल वाटप करण्यात येत आहे.

मनसे विद्यार्थी सेनेने हा उपक्रम आयोजित केला आहे. या अनोख्या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. अवघ्या 55 रुपये लिटरने पेट्रोल मिळत असल्याने अनेकजण उल्हासनगरच नव्हे तर बदलापूर, अंबरनाथ, कल्याण आणि विठ्ठलवाडी परिसरातूनही आले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 55 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने उल्हासनगरमधील मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी नागरिकांना अवघ्या 55 रुपये लिटर दराने पेट्रोल वाटप करण्याचा उपक्रम राबवला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील हिललाईन परिसरातील पेट्रोल पंपावर हे पेट्रोल वाटप सुरू आहे. यासाठी नागरिकांना कूपन वाटप करण्यात येत असून प्रत्येक नागरिकाला 1 लिटर याप्रमाणे 55 रुपये लिटर दराने पेट्रोल वाटप करण्यात येत आहे.

🤙 8080365706