
कोल्हापूर : कोल्हापूरमधील लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार एमआयडीसींचे विस्तारीकरण येत्या सहा महिन्यांत करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

शासन आपल्या दारी या कोल्हापुरातील कार्यक्रमातून त्यांनी ही घोषणा केली आहे.मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार उद्योग विभागाने कोल्हापूरचा एमआयडीसी विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे.सांगली जिल्ह्यातील आष्टा, शाहुवाडी, पन्हाळा आणि प्रकाश आबिटकरांच्या मतदारसंघातील गावामध्ये एमआयडीसीचा विस्तार करण्यात येणार असून येत्या सहा महिन्यात हे विस्तारीकरण केले जाईल आणि नवीन एमआयडीसीमध्ये १५ टक्के जागा लघू उद्योगासाठी राखीव ठेवली जाईल असं सामंत यांनी सांगितलं आहे.आपली बेरोजगारी कमी करण्यासाठी जे जे काही करता येईल ते ते हे सरकार करेल असेही सामंत यावेळी म्हणाले.
