
मुंबई : गदर एक प्रेम कथा’ हा चित्रपट जेव्हा 2021 मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा बॉक्स ऑफिसवर तो तुफान हिट ठरला होता. आता 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘गदर 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘गदर 2’मध्ये आता तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे. सनी देओलच्या मुलाची भूमिका अभिनेता उत्कर्ष साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लखनऊ आणि महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये पाकिस्तानसारखा सेट तयार करण्यात आला. गदर 2 मधील पाकिस्तानच्या सीनसाठी लखनऊमध्ये 50 दिवस शूटिंग करण्यात आली. तर अहमदनगरमध्ये 25 दिवसांची शूटिंग झाली. गदर 2 मधील ॲक्शन सीन्ससाठी टीनू वर्मा आणि साऊथचे रवी वर्मा यांची मदत घेण्यात आली. यांनी शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातील ॲक्शन सीन्सवर काम केलं होतं. याशिवाय विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांचंही चित्रपटाच्या ॲक्शन सीन्समध्ये मोठं योगदान आहे. गदर 2 हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
