जाहिरात शिवसेनेकडून मग त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का नाही? ; संजय राऊत

मुंबई : राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वेक्षण झाले. त्या सर्वेक्षणाची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो वापरला आहे. त्याशिवाय या जाहिरातीत कोणाचाही फोटो नाही. शिवसेनेकडून ही जाहिरात दिली असताना त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का नाही? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेच्या जाहिरातीत नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला आहे, पण बाळासाहेबांचा फोटो नाही. शिवसेना ज्यांचे नाव घेत आहे, त्या बाळासाहेबांचा फोटो यामध्ये नाही. मग ही शिवसेना कोणाची? शिंदेंची सेना ही मोदींची सेना आहे. शाहा यांची सेना आहे. यामुळे त्यांचा खरा मुखवटा उघड झाला आहे. ही तर मोदी यांची ‘शवसेना’ आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

🤙 8080365706