अखेर केरळमध्ये मान्सून दाखल

मुंबई : अखेर केरळमध्ये 8 जून रोजी मान्सून दाखल झाला आहे. हा मान्सून 9 जून रोजी तामिळनाडू, कर्नाटकात पोहचणार असल्याचा अंदाज आहे. आता महाराष्ट्रात पाऊस कधी दाखल होणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

वादळी वाऱ्यांमुळे मान्सून केरळमध्ये यंदा उशिराने दाखल झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रालाही पावसासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. देशात यंदा मान्सून एक आठवडा उशिराने दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता मान्सून तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दिशेने पुढे सरकत आहे. मान्सून बंगालचा उपसागर आणि दक्षिण पश्चिम मध्य आणि ईशान्य भागात पोहोचणार आहे. हवामान विभाग यावर लक्ष ठेवून आहे. पुढील 24 तासांत तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

🤙 8080365706