
कोल्हापूर : कोल्हापुरात लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे हद्दीत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे. आक्षेपार्ह स्टेटस लावण्यावरुन निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नानंतर त्या संदर्भातील अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना मंगळवारी (6 जून) रात्री देण्यात आला. पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊन वा स्टेटसमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे अहवालानुसार अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी मंगळवारी सायंकाळी ते 19 जूनच्या रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
