राज्यातील सूक्ष्म , लघु , मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र सचिव ; नारायण राणे

मुंबई : राज्यातील सूक्ष्म , लघु , मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र सचिव देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आ. प्रवीण दरेकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केंद्रीय सूक्ष्म , लघु , मध्यम विभागाचे अधिकारी व उद्योग विभाग अधिका-यांच्या सोमवारी झालेल्या संयुक्त बैठकीत राज्यात या विभागाचे उपक्रम राबविण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आल्याचेही राणे यांनी सांगितले.

🤙 8080365706