नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा होणार साजरा

कोल्हापूर : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे शिवभक्तांसाठी आनंदाचा क्षण असतो.कोल्हापुरात उद्या 6 जून रोजी नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखदार पद्धतीने साजरा होणार आहे.

या शिवराज्यभिषेक दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आज सकाळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी या तयारीची पाहणी केली. उद्या 6 जून रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित राहणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे.शाहू महाराज छत्रपती यांनी हा शिवराज्याभिषेक सोहळा 349 वा असल्याचं सांगितल आहे. संभाजीराजे छत्रपती रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहेत, तर नवीन राजवाडा येथे शाहू महाराज, मालोजीराजे आणि संपूर्ण छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. दरवर्षी जुन्या राजवाड्यात साध्या पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात होता. पण यावर्षीपासून नवीन राजवाड्यावर खूप मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

🤙 8080365706