
दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. या कुस्तीपटूंनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

या बैठकीत काय घडले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. बृजभूषण सिंह यांच्यावर ५ दिवसात कारवाई करावी असा इशारा कुस्तीपटूंनी दिला होता. अमित शहा आणि कुस्तीपट्टूंची शनिवारी रात्री दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाली. यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि काही प्रशिक्षकसुद्धा होते.बजरंग पुनियाने सांगितलं की,”गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावर मी जास्त बोलू शकत नाही.” बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट हे बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलनात सर्वात पुढे आहेत. अल्पवयीन मुलीसह सात महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी २८ एप्रिल रोजी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती.
