
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष उद्योगधंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून रहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा.
वृषभ मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायदयाच्या चौकटीन राहुन कामे करावीत. शासकीय सेवेत नियमबाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा.
मिथुन गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल.
कर्क नोकरी परिश्रमाचा पूर्ण मोबादला मिळेल. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. प्रगतिकारक दिवस आहे.
सिंह बेरोजगांना रोजगार मिळेल. मानसन्मान वाढेल. राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे.
कन्या मोठ्या व मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये. अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल.
तूळ नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल.
वृश्चिक अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील.
धनु आज संयमी भूमिका घेतली तर मोठे आर्थिक लाभ होतील. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. अनावश्यक चिंतेपासून दूर राहा.
मकर सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. घरासंबंधी समस्या दूर होतील.आपल्या हातून विशेष काम होण्याचे योग आहेत.
कुंभ जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे.
मीन योग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे
