पत्नी पीडित आश्रमतर्फे पिंपळाच्या झाडासमोर फेरी पूजन

छत्रपती संभाजीनगर : वटपौर्णिमाच्या एक दिवस आधी पत्नी पीडित आश्रमतर्फे पिंपळाच्या झाडासमोर फेरी पूजन करण्यात आलं आहे. पिंपळच्या झाडाला 121 उलटया फेऱ्या मारत उद्या यमराजाने पत्नीचे ऐकू नये यासाठी पूजन करण्यात आल्याचे पत्नी पीडित पुरुषांचे म्हणणे आहे.

महिला पुरुषांना त्रास देतात मात्र त्यांना कुणीही वाली नाही, सात जन्म हाच नवरा पाहिजे म्हणून वट पौर्णिमेला पूजा करतात. मात्र त्याचा पुरुषाला त्रासच होतो. याचाच प्रतिकात्मक विरोध करण्यासाठी दरवर्षी पत्नी पीडित आश्रमातर्फे हे पिंपळ पूजन करण्यात येते. पत्नी पीडित अश्रमानुसार देशभरात त्यांचे दहा हजार पेक्षा जास्त सदस्य आहेत. या सगळ्यांना त्यांच्या पत्नीने छळला आहे आणि म्हणून याच सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी हे पूजन करण्यात आलं असल्याचं पत्नीपीडित संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी सांगितले.

🤙 8080365706