शिवराज्यभिषेक सोहळ्याचं यावर्षी 350 वं वर्ष नाही तर 349 वं वर्ष; इंद्रजीत सावंत

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला आज तिथीनुसार 350 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने रायगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. पण काही जणांनी तिथीनुसार शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्याच्या निर्णयावर बोट ठेवलं आहे. तर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी मोठा दावा केला आहे. शिवराज्यभिषेक सोहळ्याचं यावर्षी 350 वं वर्ष नाही तर 349 वं वर्ष आहे, असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केलाय.

पुढच्या वर्षीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा 350 वा राज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला गेलाय का? असा सवाल इंद्रजीत सावंत यांनी केला. तिथीनुसार साजऱ्या केल्या जाणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जातातच कसे? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवराज्याभिषेकाचा संबंध काय? अशा शब्दांत इंद्रजीत सावंत यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

🤙 8080365706