
दूध हे पूर्ण अन्न आहे. लहानपणापासून आपल्याला दूध पिण्याची सवय लावण्यात येतेप्रत्येक व्यक्ती कोणत्याही वेळेला दूध पितात. दूध पिण्याची योग्य वेळ कोणती असावी हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

रात्री एक ग्लासभर दूध प्या. रात्री दूध प्यायल्याने पोषक तत्वांची कमतरता भरून निघू शकते. दूध हे संपूर्ण अन्न आहे. ज्यामध्ये निरोगी प्रथिने आणि अमीनो ऍसिड देखील आढळते. त्यामुळे रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.
रात्री दूध प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. दुधात फॅट नसून प्रथिने जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे भूक कमी लागते. दुधात जास्त कॅल्शियम असल्यामुळे चयापचय क्रिया योग्यरीत्या कार्य करते.
गरम दुधात लॅक्टाब्युमिन प्रोटीन आढळते. हे ट्रिप्टोफॅन अमीनो अॅसिड आहे. जे क्रिप्टोफॅन सेरोटोनिन हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात मदत करते. सेरोटोनिन मेलाटोनिन हार्मोन तयार करते. मेलाटोनिन हा झोपेचा हार्मोन आहे. जेव्हा मेलाटोनिन हार्मोन रिलीज होतो, तेव्हा रात्रीची झोप चांगली लागते. म्हणूनचं अधिक लोकं रात्रीच्या वेळी दूध पितात.
