आ. सतेज पाटील यांच्या सुचनेनंतर तावडे हॉटेल जवळील खचलेल्या रस्त्याची डागडुजी सुरू

कोल्हापूर : तावडे हॉटेल ते शाहू जकातनाका दरम्यानचा रस्ता गेल्या काही दिवसापासून खचू लागला होता. या बरोबरच मोठ्या प्रमाणात भेगाही पडल्या होत्या. परिणामी वाहतूकीसाठी हा मार्ग धोकादायक बनल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता होती. आमदार सतेज पाटील यांनी यासंदर्भात सोमवारी या रस्त्याची पाहणी करत महापालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाटगे याना डागडुजी करण्याची सूचना केली होती.याची दखल घेत महापालिकेनेआज या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली.

कोल्हापूरातील तावडे हॉटेल ते शाहू जकात नाक्या पर्यंतचा रस्ता दिवसें दिवस खचत चालला होता. त्याच बरोबर या रस्त्याच्या मध्यभागी भेगाही पडू लागल्या होत्या. या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असून रात्रीच्या वेळी खचलेल्या रस्त्यामुळे अपघाताची शक्यता होती. या रस्त्याबाबत नागरिकांनी आम. सतेज पाटील यांचे लक्ष वेधले होते. मंगळवारी आम. सतेज पाटील यांनी महापालिका शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या समवेत या रस्त्याची पाहणी केली. दोन्ही बाजूनी खचलेला रस्ता, रस्त्याला पडलेल्या मोठ्या भेगा, संरक्षणासाठी रस्त्याच्या कडेला उभारलेल्या दुभाजकाचे उखडलेले खांब अशी अवस्था पाहून आ.सतेज पाटील यांनी महापालिका शहर अभियंता हर्षजित घाटगे यांना या रस्त्याची तातडीने डागडुजी व रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या भेगा मुजवण्याच्या सुचना केल्या होत्या.आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनंतर महापालिका प्रशासनाने आज तावडे हॉटेल येथील रत्याची डागडुजी करण्यास सुरुवात केलीय.आज सकाळपासून रस्त्याच्या डागडुजी सोबत रस्त्याला पडलेल्या भेगा देखील बुजवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या या धोकादायक रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू केल्याने वाहनधारक आणि नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे .

🤙 8080365706