
मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभूषन सिंह यांच्याविरोधात“खेळाडूंच्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर, लोकशाहीत ते स्वागतार्ह नाही. केवळ खासदारच नाही तर, एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे असे मत भाजपा खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

बृजभूषन सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन छेडलं आहे. याला भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. “केंद्र सरकारकडून कुस्तीगीरांशी संवाद साधायला कोणीच गेले नसल्याची” खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.कुस्तीपटूंचे समर्थन करत खा. प्रीतम मुंडे म्हणाल्या कि, “खेळाडूंच्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर, लोकशाहीत ते स्वागतार्ह नाही. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती, यातील सत्य समोर यायला हवं होतं. सरकारकडून महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणीच गेलं नाही. ते व्हायला हवं होतं. या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी असे म्हणत प्रीतम मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
