मी भाजपची पण भाजप माझी थोडीच ; पंकजा मुंडे

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे, असं सूचक विधान माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

त्यांच्या या विधानानंतर भाजपमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी खूप काम केले. त्यामुळेच आज सरकार पाहायला मिळत आहे असंही त्यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी उघडपणे वेळोवेळी बोलून दाखवली आहे. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असेही त्यांनी याआधी बोलून दाखवले होते. त्यावेळी भाजपचे सरकार होते. त्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलेले जात होते. दरम्यान, नाराजी व्यक्त करताना त्यांनी भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच असल्याचे देखील म्हटले आहे.

🤙 8080365706