
पुणे : इयत्ता दहावीचा निकाल उद्या लागणार आहे. उद्या शुक्रवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे.

त्यामुळे या निकालाकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचं लक्ष लागलं आहे.राज्यातून एकूण १५,७७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये ८४ हजार ४१६ मुले असून ७३ हजार ६२ मुली आहेत.
