पूर्ववैमनस्यातून दोघा तरूणांवर तलवार हल्ला

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक रोडवर पूर्ववैमनस्यातून दोघा तरूणांवर तलवार हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.

यात एका तरुणाचा हात तुटला असून दुसरा तरूण किरकोळ जखमी झाला आहे. बोंद्रे नगर – धनगर वाडा आणि लक्ष तीर्थ इथल्या दोन टोळ्यांमधील संघर्षातून हा तलावार हल्ला झाला आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,आज बोंद्रे नगर धनगर वाडा इथला प्रकाश बबन बोडके आणि त्याचा साथीदार दुपारच्या सुमारास मावा नेण्यासाठी कोल्हापुरातील शिवाजी पेठ परिसरात आले होते . यादरम्यान त्यांच्या पाळतीवर असलेल्या कांही तरुणांनी प्रकाश बोडके आणि त्याच्या साथीदाराचा अचानक पाठलाग सुरू केला .

जीवाच्या आकांताने प्रकाश बोडके आणि त्याच्या साथीदाराने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला .याचदरम्यान प्रकाश बोडके हा निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक या रोडवरील एका खासगी रिक्रुटमेंटच्या कार्यालयात घुसला .त्यावेळी त्याचा पाठलाग करणाऱ्या हल्लेखोरांनी या कार्यालयात घुसून, त्याच्यावर तलवारीने हल्ला केला . या हल्ल्यात प्रकाश बोडके याचा उजवा हात तुटला आणि त्याचा साथीदार किरकोळ जखमी झाला . अचानक घडलेल्या या घटनेमुळ परिसरात खळबळ उडाली . नागरिकांनी याबाबतची माहिती जुना राजवाडा पोलिसांना कळवली .हल्लेखोरांच्या तपासासाठी स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची ३ पथक विविध ठिकाणी रवाना केली असून, लवकरच हल्लेखोरांना अटक केली जाईल, अशी माहिती शहर पोलीस उप अधीक्षक अजित टिके यांनी दिली .

🤙 8080365706