
मुंबई : शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे गटात मोठी फूट पडणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावर आता शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे गटात मोठी फूट ही त्यांची शंभरावी खोटी माहितीये, त्यांचा पोपट खोटया चिठ्ठ्या काढतो, आम्ही चांगले काम करत आहोत हे त्यांना बघवत नसल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

तसेच महाविकास आघाडीमधील अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे.दरम्यान यावेळी बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. आम्ही चांगले काम करतो हे त्यांना बघवत नाही. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसात मिळतोय, ते हे करून शकले नाहीत म्हणून ते लोकांचं लक्ष विचलित करत आहेत. त्यांना राज्याशी काहीही देणं-घेणं नसल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.
