भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि गोकुळच्या विद्यमान संचालक शौमिका महाडिक यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी याबाबतची घोषणा केली आहे. शौमिका महाडिक यांनी यापूर्वीही 3 वर्षे भाजप महिला मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळला होता. महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणीत कोल्हापुरातून निवड होणाऱ्या त्या एकमेव महिला पदाधिकारी आहेत. शौमिका महाडिक आपल्या आक्रमक शैलीने विरोधकांना नेहमीच नामोहरम करीत असतात.भाजपची कोल्हापूर जिल्ह्यातील मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची ओळख आहे. विरोधी गट म्हणून गोकुळ मध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराला वेळोवेळी वाचा फोडण्याचे काम शौमिका महाडिक यांनी केले आहे.राजाराम कारखान्याची नुकतीच निवडणूक पार पडली.

या निवडणुकीत प्रचाराची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली.विरोधकांच्या टीकेला चांगल्याच शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले.उलट त्यांनीच विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना विरोधकांना घाम फुटलेला अवघ्या कोल्हापूरने पाहिले आहे. त्यांच्या या प्रदेश उपाध्यक्ष पदी झालेल्या निवडीने कोल्हापूरचा हा रणरागिणी अवतार आता संपूर्ण राज्याला पाहायला मिळणार आहे.

🤙 8080365706