रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे

भारतीय अन्न पदार्थात लसणाचा वापर होतोच. फोडणीसाठी लसूण हा हमखास वापरला जातो. फोडणीमध्ये लसूण नसेल तर, पदार्थाची चव बिघडते. पदार्थात लसूण टाकताच पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. पण त्याचबरोबर आरोग्यासाठी लसूण खूप फायदेशीर ठरते. तर जाणून घेऊयात रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या पाकळ्या चावून खावे. यामुळे शरीरातील अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होईल. त्यातील अँटी-हायपरलिपिडेमिया गुणधर्मामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते.

सर्दी-खोकला, तापाचा त्रास झाल्यानंतर, आपली आई किंवा आजी घरगुती उपाय म्हणून लसूण खाण्याचा सल्ला देतात. लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. यासह रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यास मदत करते.

लसणामध्ये अॅलिसिन नावाचे एक संयुग असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 4 पाकळ्या खाव्यात.

🤙 8080365706