व्हेल माशाची 10 कोटी किंमतीची उलटी जप्त

कोल्हापूर : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या 5 जणांना कोल्हापूरच्या आजरा पोलीसांनी अटक केली आहे.

तर पोलीसांनी 10 किलो 688 ग्रॅम व्हेल माशाची उलटी जप्त केली असून याची आंतरराष्ट्रीय बाजारात 10 कोटी 74 लाख रूपये किंमत असल्याचे सांगितले जात आहे. कुडाळ येथून काही जण या उलटीची तस्करी करणार असल्याची पोलीसांना माहिती मिळाली. त्या आधारावर अंबोली- आजरा मार्गावर त्यांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे.

🤙 8080365706