पन्हाळगडावर बंदची हाक

पन्हाळा : कोल्हापुरमधील ऐतिहासिक पन्हाळगडावर असलेल्या तानपिर मजारिची रात्री अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. हिंदू मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या तानपीर मजारची तोडफोड झाल्याने पन्हाळगडावर आज बंदची हाक देण्यात आली आहे.

त्यामुळे पन्हाळगडावरील सर्व व्यवहार आज बंद आहेत. शिवाय गडावर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. त्याचबरोबर धार्मिक तेढ वाढू नये यासाठी पन्हाळगडावर जाणाऱ्या पर्यटकांना बुधवार पेठ परिसरातच रोखण्यात आलं आहे. त्यामुळे एरवी गजबजलेला पन्हाळगड आज ओस पडलेला पाहायला मिळत आहे.

🤙 8080365706