मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रातही मंत्रिपद….

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रातही मंत्रिपद मिळणार आहे. आज बोलावलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेना खासदारांची बैठक बोलावली आहे. वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत, त्याआधी मुख्यमंत्री शिवसेना खासदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये राज्यातील केंद्रीय विकास कामांचा आढावा घेतला जाणार आहे, याचवेळी सर्व खासदारांसोबत मुख्यमंत्री केंद्रीय मंत्रीपदासंदर्भात चर्चाही करणार आहेत.

🤙 8080365706