शासकीय सानुग्रह अनुदान व त्यासाठी त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्याची मागणी

कोल्हापूर : करवीर तालुक्यामध्ये साधारण २३ हजार नागरिकांना शासनाची संजय गांधी निराधार श्रावण बाळ, वृध्दापकाळ अपंग याद्वारे लाभार्थ्यांना पेंशन दिली जाते. प्रत्येक महिन्याला १०००/- ते ११००/- रूपयाचे शासकीय अनुदान सदर पात्र व्यक्तिंना देण्यात येते. पेंशन मंजूर करत असताना त्यासाठी लागणारे सर्वच दाखले घेतले जातात. संजय गांधी श्रावण बाळ अपंग निराधार जेष्ठ नागरिकांना प्रत्येक वर्षांच्या एप्रिल ते जून या तिन महिन्यामध्ये सर्व पेंशन धारकांचे हयातीचे दाखले व परत उत्पन्नाचे दाखले शासनाकडे जमा करण्याचे सांगितले जाते.जेष्ठ नागरिकांकडून असे दाखले घेण्याऐवजी महसूल विभागानेच म्हणजेच शासनाने संबंधीतांच्या उत्पन्नाचे दाखले व हयातीचे दाखले याबाबतचा अहवाल सादर करावा मुळातच वयोवृध्द जेष्ठ नागरिक यांचे उत्पन्न वाढण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी वयोवृध्दांना फार त्रास सहन करावा लागतो. तलाठी ऑफिस, सर्कल ऑफिस ते तहसिलदार कार्यालय असा हेलपाटयांचा प्रवास जेष्ठ नागरिकांना सहन करावा लागतो. सहजासहजी एका जेष्ठ नागरिकांना ८ ते १० हेलपाटे मारल्यानंतर सदर उत्पन्नाचा दाखला हातामध्ये मिळतो. सध्या कडक उन्हाळा असल्याने पेंशन धारकांना उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. याचा शासनाने विचार करून चालू असलेल्या सानुग्रह अनुदान धारकांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करावी. या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने(उद्धव बाळासाहेब ठाकरे) मा.स्वप्निल रावडे, तहसीलदारसो ता.करवीर, कोल्हापूर यांना देण्यात आले.

यावेळी मा.तहसीलदार रावडे यांनी सांगितले की हा निर्णय महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे त्यामुळे तुमच्या मागण्यांचा विचार करून या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहचवू तसेच पेन्शनधारकांना दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी योग्य उपाययोजना करू असे आश्वासन मा.तहसीलदारांनी करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, कामगारसेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, उपतालुकप्रमुख राहूल गिरुले, हिंदुत्ववादी शरद माळी, अपंग सेनेचे संदीप दळवी, फेरीवाला सं. उ.ता. प्र.बाळासाहेब नलवडे,आबा जाधव, शाखाप्रमुख मनोज कुरळे, गांधीनगर शाखाप्रमुख दीपक पोपटाणी, उपशाखाप्रमुख सुनील पारपाणी आदी उपस्थित होते.

🤙 8080365706