चष्म्यावरील धूळ कशी स्वच्छ करावी…. 

सतत घातला जाणारा चष्मा हा धूळ आणि घाम यांच्या संपर्कात येतो त्यामुळे त्यावर अनेकदा बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच चष्मा वेळोवेळी स्वच्छ करणे देखील तितकच गरजेचे असते. तर जाणून घेऊयात चष्म्यावरील धूळ कशी स्वच्छ करावी?

मायक्रोफायबर कापडाने कोरडे करा :- मायक्रोफायबर कापड हे लिंट फ्री असते, त्यामुळे पुसताना लेन्सवर स्क्रॅचच्या खुणा उमटत नाहीत. यासाठी एकदा चष्मा सौम्य साबणाने धुवून ते सुकविण्यासाठी मायक्रोफायबर कापडाचा वापर करावा.

लिक्विड सोपचा वापर करावा :- चष्मा स्वच्छ करण्यासाठी लिक्विड सोपचे काही थेंब बोटांवर घेऊन हलक्या हाताने लेन्स स्वच्छ करा. त्यानंतर मायक्रोफायबरचं कापडं किंवा चष्म्याचा रुमाल थोडा ओला करून चष्मा स्वच्छ पुसावा. चष्मा धुण्यासाठी कोमट पाणी वापरावं जास्त गरम पाण्याचा वापर करू नये. यामुळे लेन्सवरील कोटिंग खराब होवू शकते.

सॅनिटायझरचा करा वापर :- अधून मधून किंवा तुम्ही बाहेरून आल्यावर चष्मा सॅनिटाइज करणं गरजेचं आहे. मात्र हे करत असताना चष्म्यावर सॅनिटाइजर टाकून ठेवू नका. सॅनिटायजर लावून चष्मा लगेचच कोरडा करून घ्यावा नाहीतर लेन्सवर डाग राहण्याची शक्यता असते. 

🤙 8080365706