
मुंबई : संजय राऊत सर्वात मोठा जादूटोना करणारा तुझा मालक आहे. काळी जादू करून ठाकरेंनी काय काय केलं हे आम्हाला माहीत आहे. मातोश्रीच्या मागील भागात जेसीबीने खोदून लिंब का टाकलेली याची माहिती द्यावी का?, असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बोलत असताना उद्धव ठाकरेंचे पगारी कामगार संजय राऊत यांनी नाना पटोलेंच्या अप्रत्यक्ष थोबाडीत मारलं आहे. काही दिवसांपूर्वी बिकेसीवर एक बैठक झाली. त्यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यात ती बैठक झाली. त्यात जास्त जागा आपण घ्यायच्या आणि उरलेल्या जागा काँग्रेसला द्यायचं अस ठरलंय. काँग्रेसचा कार्यक्रम करण्याचे अटळ आहे, असं नितेश राणे म्हणालेत.
